शुक्रवार आणि शनिवारी आढळलेल्या रुग्णांत बार्शी शहरातील ७७, तर ग्रामीण भागातील ३७ रुग्णांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नगरपालिका आणि पोलीस विभागाने नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
बार्शी शहर मोठी व्यापारी पेठ असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून विनामास्क फिरणारे नागरिक, दुकानांत गर्दी करणारे व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे. पालिकेच्या वतीने शहरातील व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट केली जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे.
दररोज होताहेत टेस्ट
शहरात व्यापाऱ्यांच्या टेस्ट दररोज केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी शहरात ५६६ आणि ग्रामीण भागात ६०८ अँटिजन, ग्रामीण भागात १ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. सहा जण उपचारानंतर बरे झाले, तर एकाचा मृत्यू झाला आहे.