कुरनुर धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. इतर दरवाजांवरूनही पाणी वाहात आहे. सध्या १८०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. मागच्या वर्षी पाटबंधारे खात्याने साफ दुर्लक्ष केल्याने कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावर लोकमतने प्रकाश टाकताच भौतिक बाबींची पूर्तता करण्यात आली. यंदा पुन्हा मागच्या वर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुण मुले या धरणावर गर्दी करीत आहेत. अनेकजण कुटुंबीयांसमवेतच धरणावरील नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी येत आहेत. लहान मुलांनाही धरणावर घेऊन जात आहेत. पाय घसरून किंवा हात निसटून पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाने वेळीच दखल घेऊन तत्काळ सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे.
...........
सध्या धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणी येत आहे. दरवाजे उघडले असले तरी दरवाजांवरून पाणी वाहात आहे. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता धरणावर सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठांकडे सुरक्षारक्षकांची मागणी केली जात आहे.
- प्रकाश बाबा, उपविभागीय अभियंता, बोरी मध्यम प्रकल्प
.............
कुरनूर धरणावर पर्यटकांची गर्दी वाढत जात आहे. सुरक्षारक्षक नसल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोणताही धोका होणार नाही. पाटबंधारे खात्याने कुरनूर धरणावर तत्काळ सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यासाठी कार्यवाही करावी.
- उमेश पाटील, सरपंच, चपळगांव
.........
(फोटो ओळी : कुरनूर धरणावर जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यात तरुण मुले दंग झाल्याचे पाहायला मिळत आहे.
........
(फोटो ०५चपळगाव कुरनूर धरण)
050921\20210905_130455.jpg
धरणाच्या दरवाजावरून पाणी पडत असताना समोरील बाजूस जीव धोक्यात घालून सेल्फी काढताना युवक..