सोलापूर: नवरात्रोत्सवानिमित्त रुपा भवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विरुद्ध दिशेने नको सरळ या असा सल्ला देणाऱ्या महिला फौजदारास महिला भाविकाकडून रागानं हातातली वस्तू भिरकावून मारली. यात फौजदार महिला जखमी झाल्या. दुपारी बाराच्या सुमारास रुपाभवानी मंदिरात ही घटना घटना घडली. या प्रकरणी कशिश ओंकार वाले (वय- २३, रा. जैन मंदिर शेजारी, सम्राट चौक, सोलापूर) या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
या प्रकरणी महिला फौजदार संजीवनी संगेश व्हट्टे (वय- ३५) यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, रविवारी व्हट्टे यांची रुपाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे यासाठी बंदोबस्तासाठी ड्यूटी होती. त्यांच्या सोबत अन्य महिला पोलीसही होत्या. दुपारी बाराच्या सुमारास यातील कशिश ओंकार वाले ही महिला दर्शनासाठी विरुद्ध दिशेने येत होती. तिस व्हट्टे सरळ दर्शन रांगेत या असे सांगता असताना त्या महिलेने हातातील वस्तू फौजदार व्हट्टे यांच्या दिशेने भिरकावनू मारत ‘तू दर्शन रांगेत या असे सांगणारी कोण?’ म्हणत अंगावर धावून येत हातातील वस्तू फौजदार व्हट्टे यांच्या तोंडावर मारली. यात झालेल्या झटापटीत फौजदार महिलेच्या गळ्यावर व हातावर नखे ओरखटल्याने त्या जखमी झाल्या.
या प्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून कशिश वाले या महिलेविरुद्ध जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. तपास सहाय्यक फौजदार पवार करीत आहेत.