संताजी शिंदे, साेलापूर: जुळे सोलापूरातील बॉम्बे पार्कमध्ये घरासमोरील रिकाम्या जागेत ठेवण्यात आलेले मंडपाचे साहित्य काढण्याच्या कारणावरून, जातीचा उल्लेख करीत मारहाण केल्याप्रकरणी आकरा जणांविरूद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडू धायगुडे, मानव धायगुडे, यश माेटे, ओंकार मोटे, देशपांडे, शेटे व अन्य पाचजण (सर्व रा. बॉम्बे पार्क) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बाळकृष्ण सदाफुले यांनी सोसायटीच्या रिकाम्या जागेत मंडपाचे साहित ठेवले होते. हे साहित्य काढण्याच्या कारणाावरून गुन्हा दाखल झालेल्या लोकांनी मिळून जातीचा उल्लेख करत दगडाने, विटाने अन तलवारीने मारहाण केली. मारहाणीत बाळकृष्ण सदाफुले, युगंधर सदाफुले व लहान भाऊ असे तिघेजण जखमी झाले. युगंधर सदाफुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकरा जणांविरूद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून, तपास सहायक पोलिस आयुक्त परमार करीत आहेत.