सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचा स्मृती समारोह संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुध्दचंद्र झपके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी, झपके कुटुंबीयांसह नातेवाईक, सेवानिवृत्त प्राचार्य, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी संस्था स्थापन करत असताना जे आदर्श घालून दिलेले आहेत, त्याच आदर्शानुसार व तत्त्वानुसार संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे हेच ध्येय घेऊन आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके यांनी सांगितले.
कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृतिदिनानिमित्त समाधी दर्शन व सामुदायिक प्रार्थना पार पडली. सकाळी ८ वा. सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे संस्था सदस्या मंगलप्रभा कोरी यांच्या हस्ते कै. बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण केला.
प्रास्ताविक प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी केले. सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर व सुनील जवंजाळ यांनी केले. तर प्राचार्य नारायण विसापुरे यांनी आभार मानले.
फोटो ओळ :::::::::
कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृती सांगता समारोह प्रसंगी बोलताना डॉ. प्रदीप आवटे. यावेळी संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके.