श्रीपूर : साखर कारखानदारीमध्ये सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणल्या जाणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा सर्वोत्कृष्ट बेस्ट एमडीचा पुरस्कार पाडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याचे ''''व्हीएसआय''''चे महासंचालक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ.यशवंत कुलकर्णी हे सात वर्षांपूर्वी पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालकपदी रुजू झाले होते. सुरुवातीपासून पांडुरंग कारखान्याचे आर्थिक व्यवस्थापन केले. त्यामध्ये कारखान्याच्या कामगारांचा पगार वेळेवर करण्यास सुरुवात केली. सर्व ठिकाणी सुसूत्रता आणली. योग्यरितीने गाळप करून जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा ठेवण्याचा मान पटकावला आहे, तसेच कारखान्यांमध्ये आधुनिकीकरण करून प्रगतीपथावर नेले. त्यांच्या कारकिर्दीत कारखान्याला सहकारभूषण, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, तांत्रिक कार्यक्षमता, ऊर्जा संवर्धन, उत्कृष्ट करदाते असे अनेक पुरस्कार देश व राज्य पातळीवर पटकावले आहेत.
---
फोटो : ०७ यशवंत कुलकर्णी