कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यांना वेळेवर बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी रुग्णाला व त्याच्या नातेवाइकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टी टाळायच्या असतील, तर नागरिकांनी यावर प्रतिबंधात्मक उपाचार करणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून लक्षणे दिसण्यापूर्वीच दुसऱ्यालाही संसर्ग होण्याची शक्यता आहे. यासाठी सतत मास्कचा वापर करावा, असे सचिन ढोले यांनी सांगितले.
ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. लग्न सोहळे, मुंज, अंत्यविधी, पिंडदान, सामूहिक प्रार्थना, सभा, जत्रा, भंडारा यासारखे धार्मिक कार्यक्रम टाळावेत. शेतात सध्या खरीप हंगामाची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदीसाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.