साेलापूर : शहरातील खासगी डाॅक्टरांनी काेराेना सदृश्य रुग्णांना चाचणी करण्याचा सल्ला देणे आवश्यक आहे. या रुग्णांची माहिती पालिकेच्या नागरी आराेग्य केंद्राकडे पाठविणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल हाेईल, असा इशारा आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी दिला.
जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी दक्षता म्हणून ७ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांनी कठाेर निर्बंध आणि नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. काेराेनाची लक्षणे असलेले रुग्ण अनेकदा खासगी डाॅक्टरांकडे तपासणीसाठी जातात. डाॅक्टरांनी त्यांच्यावर उपचार करताना त्यांची काेराेना चाचणी करुन घेण्याचा सल्ला द्यावा. त्याची नाेंद ठेवण्यात यावी.
डाॅक्टरांना यापूर्वी महाकवच हे ॲप देण्यात आले आहे. त्याचाही वापर करावा. संशयित रुग्णांची माहिती नागरी आराेग्य केंद्रांना कळविण्यात यावी. एखाद्या भागात काेराेनाबाधीत रुग्ण दगावला तर पालिकेची यंत्रणा विविध कारणांचा शाेध घेईल. त्या रुग्णाने काेणत्या डाॅक्टरांकडे उपचार घेतले. या डाॅक्टरांनी वेळेवर त्याला काेराेना चाचणीचा सल्ला दिला हाेता की नाही याबद्दल पालिकेची यंत्रणा माहिती घेईल. डाॅक्टरांचा हलगर्जीपणा आढळून आला तर डाॅक्टरांवर गुन्हा दाखल हाेईल. यापूर्वी शहरातील तीन डाॅक्टरांविरुध्द गुन्हा दाखल झाल्याचाही संदर्भ आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.
नियंत्रण कक्ष पुन्हा सज्ज
पालिकेच्या नियंत्रण कक्षातून पुन्हा पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त पी. शिवंशकर यांनी सांगितले. शाैचालयाची स्वतंत्र व्यवस्था असलेल्या आणि साैम्य लक्षणे रुग्णाला घरी राहूनच उपचार घेता येतील. मास्क, साेशल डिस्टन्स न पाळणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई हाेईल. सध्या वाडियामध्ये व्कारंटाइन सेंटर सुरू आहे. गरज पडली तर दाेन दिवसांत दाेन ते तीन व्कारंटाइन सेंटर सुरू करता येतील, अशी पालिकेची तयारी असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.