भैरवनाथ शुगरने २०१८-१९ मध्ये गाळप सुरू झाल्यानंतर सुरुवातीस दोन महिने उसाला २ हजार २०० रुपये भाव दिला. मात्र नंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. कारखान्याने अनेक वाहनधारकांच्या नावावर शेतकऱ्यांच्या परस्पर लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे. हे कर्ज थकीत झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर बँकेचे नाव लागले आहे. या रकमेला हा कारखाना व्याज देत नाही किंवा लाभांश देत नाही व ही रक्कम परत मागण्यास गेल्यास शेतकऱ्याला हुसकून लावले जाते. या सर्व प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा. यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करीत असल्याचे या पत्रात चिवटे यांनी म्हटले आहे.
..............
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षापासून साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. अवघ्या १३० ऊस उत्पादकांचे २६६ रुपये प्रमाणे पेमेंट राहिलेले आहेत. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने यंदाचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर साखर बाहेर पडल्यानंतर व्यवहार सुरू होतील. त्यानंतर त्या १३० ऊस उत्पादकांचे थकित पेमेंट प्राधान्यक्रमाने देण्यात येईल.
-प्रा. शिवाजीराव सावंत, चेअरमन, भैरवनाथ, शुगर विहाळ