२३ ऑक्टोबर रोजी कारखाना सुरू झाला. इंजिनिअरिंग व उत्पादन विभागाच्या तांत्रिक अडचणी पूर्ण करून व शेती खात्याकडून नियमित ऊस पुरवठा होत असल्यामुळे गाळपामध्ये सातत्य राहिले आहे. त्यासाठी भैरवनाथ साखर उद्योग समूहाचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांचे निर्णय व प्रोत्साहन व्हा. चेअरमन अनिल सावंत यांचे नियोजन, शेती खात्याकडे स्वतः लक्ष घातल्यामुळे व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला.
कारखान्याने दिवसाला सरासरी ४,१७० टनाप्रमाणे ऊस गाळप केले असून, ४८ दिवसात २ लाख गाळप पूर्ण होऊन १,८१,७०० पोती साखर उत्पादन झाले आहे. दिवसाचा साखर उतारा ९.७५ असून, सरासरी साखर उतारा ९.१५ मिळाला आहे. साखर उताऱ्याच्या बाबतीत भैरवनाथ शुगर लवंगी युनिट ३ नामांकित सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीत आहे.
यासाठी जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, अनिल पोरे, राजाराम कोरे, शेती अधिकारी शिवाजी चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे, संजय राठोड, देवानंद पासले यांच्यासह ऊस पुरवठादार, शेतकरी, तोडणी ठेकेदार, वाहन मालकांनी परिश्रम घेतले.
----