शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

भाळवणी ग्रामपंचायतीत अपहार

By admin | Published: May 13, 2014 2:08 AM

९.५७ लाख रक्कम: तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल

उपरी : भाळवणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीमध्ये सन २००२ साली बोगस कामे दाखवून तब्बल ९ लाख ५७ हजार ७८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच लक्ष्मी यशवंत कुचेकर व ग्रामसेवक जे. पी. भांडे यांच्याविरुद्ध सोमवारी (१२ मे) पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी भारत रेपाळ यांनी गुन्हा दाखल केला आहे. १ फेबु्रवारी २००२ ते ३१ जुलै २००२ या कालावधीत सरपंच लक्ष्मी कुचेकर व ग्रामसेवक जे. पी. भांडे यांनी संगनमताने प्रमाणकाशिवाय ८६५७८ टी.सी.एल. पावडरची बोगस खरेदीमध्ये २२२००, पाईपलाईन दुरुस्तीमध्ये ६७२७६, कर्मचारी वेतन बोगस खर्च १७३००, ग्रामपंचायतीच्या वसुलीपेक्षा कमी भरणा ६३७९, शिलकेनुसार कमी भरणा १८०८, निनावी जमा व खर्च दाखवून ६४९७४, दरपत्रकाशिवाय नियमबाह्य खरेदीत २,३४,८०२, बोगस साहित्याचा खर्च २,९३,८३० बांधकाम न करता खर्च दाखवून १,३४,७८०, मूल्यांकनाशिवाय १,४६,२६६, वीज बिल दंड ६३८, ठेवी नियमबाह्य ८४०००, ग्रामनिधीची रक्कम जमा न करता परस्पर खर्च ५४,८००, मोघम खर्च १ लाख ८ हजार २४ असा एकूण ९ लाख ५७ हजार ७८ रुपयांचा अपहार केला. याबाबत तत्कालीन विस्तार अधिकारी पी. एम. शिंदे यांनी चौकशी करून कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविला होता. यावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनी सुनावणी घेत संबंधितांनी अपहाराची रक्कम तत्काळ न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकार्‍यांना दिले होते. याबाबत पंढरपूरचे गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, विस्तार अधिकारी भारत रेपाळ यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना अपहाराची रक्कम भरण्याविषयी वेळोवेळी लेखी पत्र दिले. मात्र सरपंच लक्ष्मी कुचेकर, ग्रामसेवक जे. पी. भांडे यांनी रक्कम न भरल्यामुळे गुन्हा नोंदला आहे. तपास कल्याण ढवणे करीत आहेत.

------------------------------------------

अशिक्षित सरपंचांचा घेतला फायदा ४महिला आरक्षणामुळे लक्ष्मी कुचेकर यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. मात्र त्या अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेत ग्रामसेवक भांडे याने ९ लाख ५७ हजारांचा अपहार केला आहे. सध्या सरपंच या मोलमजुरी करीत असल्याने अपहाराची रक्कम कशी भरायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.

----------------------------------------------

भाळवणीपाठोपाठ उपळाई, टेंभुर्णीतही अपहार

भाळवणी ग्रामपंचायतीमध्ये अवघ्या सहा महिन्यात ग्रामसेवकाने ९ लाख ५७ हजारांचा अपहार केला. यानंतर बदली झाल्यावर माढा तालुक्यातील उपळाई ग्रामपंचायतीमध्ये अंदाजे ११ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मागील महिन्यात गुन्हा नोंदला आहे. तर टेंभुर्णी ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या अपहाराची चौकशी सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.