आशिष भालेराव हा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम येऊन विभागीय स्पर्धेमध्ये द्वितीय येऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. दि.३ ते ५ सप्टेंबरमध्ये राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा झाल्या. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांच्या हस्ते मुंबई येथे आशिष भालेराव याचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील बंगळुरु येथे होणाऱ्या पुढील कौशल्य स्पर्धा परीक्षेमध्ये त्याची निवड झाली आहे. भालेराव यास संस्थेचे प्राचार्य दुधाने तसेच कोठारी उद्योग समूहाचे उज्ज्वल कोठारी, शिल्पनिदेशक एच. बी. बचुटे, एस.आर गोलेकर, व्ही.डी. भांगे, एस. के. हिप्परगे, आर.एन शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
.........
फोटो ओळी
मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ब्रांझपदक रोजगार मंत्री नवाब मलिक व संचालक दिगंबर दळवी यांच्या हस्ते ब्रांझपदक स्वीकारताना आशिष भालेराव.
.........
(फोटो १२मोहोळ)