भोगावती व नागझरी नदीचा संगम वाळुज येथे झाला आहे. या नदीवरील देगांव, डिकसळ, बोयरे येथील बंधारे कोरडे पडले आहेत. भोगावती नदीचा उगम उस्मानाबाद जिल्ह्यातील रामलिंगच्या डोंगरातून झाला आहे. भोगावती नदीवर हिंगणी (ता. बार्शी) येथे एक मोठे धरण आहे. ते धरणही कोरडे होण्याच्या मार्गावर आहे.
या नदीवर बार्शी तालुक्यातील तडवळे, इरले, काळेगाव येथील बंधारे कोरडे आहेत. नागझरी नदीचा उगम. तुळजापूर येथील रामदरी येथून झाला आहे. या नदीवर जवळगाव (ता. बार्शी) येथे एक मोठे धरण आहे. या नदीवर हत्तीज, धामणगाव, राळेरास, सासुरे, दहिटणे येथील बंधारे कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांचा पाण्याचा आणि वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
----