अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बसवणप्पा शिरगुरे होते.
यावेळी अंबणप्पा भंगे, सिद्धाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगाव, विश्वनाथ पाटील, रियाज पटेल, परमेश्वर वाले, श्रावण गजधाने यांच्यासह नूतन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी सरपंच उमेश पाटील आणि सिद्धाराम भंडारकवठे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर भूमिपूजन केले.
यावेळी गणेश कोळी, महिबूब तांबोळी, विलास कांबळे, रमेश अचलेरे, प्रदीप वाले, मल्लिनाथ सोनार, विश्वजीत कांबळे, स्वामीनाथ जाधव, सुरेश सुरवसे, सायबू म्हमाणे, स्वामीनाथ शिरगुरे, अंकुश जाधव, भगवान जाधव, धनराज जाधव, पमू बावकर,पोलीस पाटील दयानंद बावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष बावकर यांनी केले.
विकासासाठी कटिबध्द- उमेश पाटील
सत्काराला उत्तर देताना सरपंच उमेश पाटील यांनी चपळगाव व बावकरवाडीच्या विकासासासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. जनतेला मुलभूत सोयी पुरविण्यासोबतच स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
फोटो
०६चपळगाव०१
बावकरवाडी येथे हनुमान मंदिर सभामंडपाच्या भूमिपूजन करताना सरपंच उमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ.