यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सध्या कामती पोलीस ठाण्याचा कारभार केवळ दोन खोल्यांमध्ये चालतो. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पोलीस ठाण्याला मैदानही कमी आहे. त्यामुळे वाहने रस्त्यावर उभी करावी लागत होती. त्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. या सर्व गैरसोयी लक्षात घेऊन अंकुश माने यांनी पदभार स्वीकारताच पत्रकार परिषद घेऊन लोकवर्गणीतून पोलीस ठाणे बांधण्याचा मानस व्यक्त केला. त्याप्रमाणे सोलापूर- मंगळवेढा रोडवा पोलीस ठाण्याची दोन एकर जागा शिल्लक असल्याने या जागेवर बांधकाम करण्याचा निश्चय केला.
फोटो
२३ कामती पोलीस ठाणे
ओळी
कामती पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, विभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने आदी.