यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे, पं.स. सदस्य अजय सकट, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण डाके, राहुल रेडे-पाटील, बाबासाहेब माने-पाटील, आप्पासाहेब देशमुख, निवृत्ती भुसारे, रावसाहेब सावंत-पाटील, नारायण पाटील, मौला पठाण, राजकुमार पाटील, ॲड. विशाल पाटील, कृष्णात खटके, उदयसिंह देशमुख, बंडू वाळेकर, माउली हाके, राहुल खटके-पाटील, प्रकाश केचे, गजानन पाटील, मधुकर पवार, सुरज शिंदे, सुनील शिंदे, अरुण कदम, माणिक गुळूमकर, महादेव निंबाळकर, प्रकाश साठे, उंबरे (वे) उपसरपंच सुनील राजमाने, आबा झुरळे, ज्ञानेश्वर भोसले, सुनील भोसले, सचिन गुळूमकर, सुमित भोसले, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यासाठी १४ गावातील विकास कामांसाठी आतापर्यंत ४८ कोटी रुपयांचा निधी वेगवेगळ्या योजनेतून दिला आहे. यावर्षी पंतप्रधान सडक योजनेमध्ये १० कोटी रुपयांचा निधी, बजेटमध्ये ७-८ कोटी रुपये दिले. जिल्हा परिषदेमधूनही या भागासाठी निधी दिला असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले. यावेळी उत्तमराव जानकर यांनीही माळशिरस तालुक्यातील गावांसाठी गेल्या दहा वर्षात कामाचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केला असून, विकास कामे केली असल्याचे सांगितले.