याप्रसंगी नगरपरिषदेतील निवृत्त अधिकारी व ज्येष्ठ समाजसेवक भीमाशंकर धारूरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष व नगरसेवक विलास रेणके, क्रीडाशिक्षक रमेश आजरी, अभियंता विलास नकाते, नागेश लामतुरे, अनिल बेणे, आप्पा गुडे, मल्लिनाथ गाढवे, सुनील फल्ले, बंडू वायकर, महेश गुडे, गणेश भडुळे, विवेक डोंबे, उमाकांत बुगडे, आदी उपस्थित होते.
या सुविधा उपलब्ध
याप्रसंगी बोलताना विलास रेणके म्हणाले, समाजाची वारंवार मागणी होत असल्याने वीरशैव लिंगायत समाज या संस्थेच्या माध्यमातून रखवालदाराची नियुक्ती, लोकसहभागातून चार-पाच वर्षे चांगल्या जोपासना केलेल्या आठ ते बारा फूट उंचीच्या वृक्षांची लागवड केली आहे. हातपाय धुण्यासाठी पाणवठा, पाण्याच्या आकर्षक कारंजासह कैलास पर्वतावरील विराजमान ध्यानस्थ महादेवाची मूर्ती, आलेल्या समाजबांधवांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्थेचे निवारा शेड, इत्यादी सुविधा केल्या आहेत.
पालिकेकडून संरक्षक भिंतीचे काम सुरू
नगरपरिषदेच्या माध्यमातून संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. यापुढील उद्दिष्टांमध्ये आकर्षक प्रवेशद्वार, सिमेंट रस्ते, गरजेच्या विविध ठिकाणी बैठकीसाठी सोय, जागेवरच मिठाची उपलब्धता, खड्डे खणण्यासाठी ट्रॅक्टरसह यंत्रसामग्री, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या समाजबांधवांना स्मशानभूमीतही प्रेरणा मिळावी यासाठी आकर्षक मूर्तिस्थल यांसारखी विकासकामे करण्यात येणार आहेत.