साेलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला येथे राउंड टेबल (१५०) कडून २१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या चार वर्गखोल्या बांधकामाचे भूमिपूजन पी. एल. कोळी, कपिल जाजू व आनंदराव कोले यांच्या हस्ते झाले. संस्थेचे आधारवड स्व. दिनानाथ कमळे यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रावसाहेब पाटील व पंचायत समितीचे सभापती प्रशांत कडते यांच्या हस्ते झाले. कपिल जाजू यांनी मनोगतातून बांधकामासाठी मदत केलेल्यांचे कौतुक केले. यावेळी प्राचार्य पी. एम. कमळे, राउंड टेबलचे उपाध्यक्ष रोहन शालगर, राज राठी, नितीश गाला, पराग ढाळे, भव्य शहा, अनूप मालपाणी, रोहन राठी, वासुदेव बंग, गिरीश मुंदडा, ओंकार पत्की, गुरुदीप दोडमनी, विक्रम देसाई, अशीत पंचमीया, निखिल सुराणा, आकाश संकलेचा, विष्णू राठी, सचिन भंडारी, स्वप्नील मर्दा, संस्थेचे सचिव एम. डी. कमळे, खजिनदार प्रा. व्ही. के. पाटील, काशप्पा कोळी, शरीफ शेख, संजय कोले, तुकाराम शेजाळे, योगेश जोकारे, अनिल गावडे, गुड्डूभाई जमादर, पर्यवेक्षिका दशवंत उपस्थित होते.
---
फोटो : २२ राऊंड टेबल
राउंड टेबलच्या वतीने जीवन ज्योत प्रशालेत चार वर्गखोल्या बांधण्यात येत आहेत. याच्या भूमिपूजनप्रसंगी एकत्रित आलेले पी. एल. कोळी, कपिल जाजू, आनंदराव कोले,