समाज मंदिर बांधण्यासाठी महादेव जानकर यांनी २२ वर्षांपूर्वी ही जागा नगरपालिकेस बक्षीस म्हणून दिली होती. परंतु अद्यापपर्यंत तेथे कसलेही काम झाले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक आनंदा माने यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील नगराध्यक्षांच्या १५ टक्के रकमेच्या फंडातून हे काम मार्गी लावण्याचे ठरवून आवश्यक त्या मंजुऱ्या मिळवून नगराध्यक्षा राणी माने यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सोमनाथ ठोकळे, महादेव जानकर, सुरेश जानकर, दासू जानकर, काशिलिंग गावडे, दीपक श्रीराम, म्हाळाप्पा शिंगाडे, आकाश करे यांच्यासह ठेकेदार प्रणय बुरांडे उपस्थित होते.
कोट :::::::::::::
वैशिष्ट्यपूर्ण योजना व न.पा. फंडामधील नगराध्यक्षांच्या १५ टक्के रकमेच्या फंडातून प्रभाग क्र. १ मध्ये वाड्या वस्त्यावरील पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच रखडलेले समर्थ निवास ते शफू बागवान घर व सुभाष इंगोले घर ते अभिमान इंगोले घरापर्यंत आरसीसी गटार बांधण्याचेही काम पूर्ण झाले आहे. लवकरच इतर कामेही मार्गी लागतील.
- आनंदा माने, गटनेते