यावेळी पं. स. सदस्य इंद्रजित चिकणे, बाजार समितीचे संचालक बापूसाहेब शेळके, माजी उपसभापती केशव घोगरे, जलसंधारण विभागाचे जिल्हा कार्यकारी अभियंता अण्णासाहेब कदम, उपविभागीय अभियंता धनंजय सावत्रे, शाखा अभियंता किरनाळे, प्रमोद मोरे, बाबासाहेब काटे, सरपंच दादासाहेब बरबडे, प्रताप बरबडे, धनराज बरबडे, बापूसाहेब बरबडे, श्रीकर बरबडे, प्रताप बरबडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार राऊत म्हणाले, माजी आमदार दिवंगत चंद्रकांत निंबाळकर यांचे स्वप्न होते की वैराग भागातीलही गावांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. बार्शी तालुक्यातील शेतकरी हा प्रगतशील व सधन असला पाहिजे हे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो
११वैराग-भूमिपूजन
ओळी
रस्तापूर येथे साठवण तलावाच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार राजेंद्र राऊत. समवेत इंद्रजित चिकणे, बापूसाहेब शेळके, केशव घोगरे, अण्णासाहेब कदम, धनंजय सावत्रे आदी.