शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीला मोठा धक्का; केसीआर यांच्या भेटीसाठी भगीरथ भालकेंचे पुण्यातून हैद्राबादकडे टेक ऑफ

By appasaheb.patil | Published: June 07, 2023 11:48 AM

पंढरपुरात राजकीय समीकरणं बदलणार, आज चंद्रशेखर राव यांच्यासोबत होणार बैठक

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील स्व. आमदार भारत भालके यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. केसीआर यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी पुण्याला खास विमान पाठवले होते. बुधवारी सकाळी ते खास विमानाने सहपरिवार पुण्याहून हैदराबादकडे रवाना झाले. त्यामुळे ते लवकरच चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा पंढरपूर, मंगळवेढ्यात रंगल्या आहेत.

दरम्यान, भगीरथ भालके हे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरते, यावर बरंच काही अवलंबून आहे. खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, भालके यांनी आजपर्यंत ‘वेट ॲंड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र, ते चार्टर्ड विमानाने आज, सकाळी हैदराबादला रवाना झाले. त्यांच्यासमवेत आई जयश्री भालके, पत्नी प्रणिता भालके, भाऊ व्यंकट भालके, रूद्रतेज भालके, शौर्यतेज भालके यांच्यासह माजी आमदार शंकर धोंगडे, मारूती जाधव आदीजण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

हैदराबादचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी खास चार्टर्ड विमान आपल्यासाठी पाठविले आहे. आमची बैठक आज बुधवारी दुपारच्या दरम्यान नियोजित आहे. त्या बैठकीत चर्चा केल्यानंतर परत येऊन जवळचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.भगीरथ भालके, राष्ट्रवादी नेते, पंढरपूर

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसTelanganaतेलंगणा