यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांची एफआरपी कमी निघाली आहे. चालू हंगामात जिल्ह्यातील एकाही कारखान्याचा साखर उतारा दहा टक्क्यांवर गेला नाही. त्यामुळे पुढील वर्षीही एफआरपी कमी मिळणार अशी चिंता ऊस उत्पादकांना लागून राहिली आहे. प्रतिटन उसापासून किती साखरेचे उत्पादन होते यावर सध्या दर निश्चित होत असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून साखर कारखानदारांचा साखर उतारा कमी दाखवत आहेत. जिल्ह्यात कारखान्यांना एफआरपी कमी दिसत आहे. याबाबत शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
गेल्या हंगामात टनाला अडीच हजार रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांना पुढील हंगामात दोन हजारांच्या आतच दर मिळतो की काय अशी चिंता शेतकऱ्यांना ग्रासली आहे. चालू गळीत हंगामात सरासरी साडेआठ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या गाळप हंगामाच्या तुलनेत साखर उतारा दीड ते दोन टक्क्याने घटला आहे. एफआरपी हा उसाचा अंतिम दर नाही असे सी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार कारखान्याच्या महसूल उत्पादनावर आधारित दर देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार साखर व उपपदार्थ उत्पादनाच्या एकूण उत्पादनातील ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागते तोच अंतिम भाव ठरतो.
सोलापूर जिल्ह्यामध्ये सलग तीन वर्षे साखर उतारा घटत आहे त्यामुळे दरवर्षी एफआरपी कमी होत चालली आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी असे २५ कारखाने जवळपास ३९ लाख ८३ हजार २३२ ऊस गाळपाचे गाळप करून ३२ लाख ८३ हजार ४८२ साखर व त्याचे उत्पादन करून ८.२४ टक्के साखर उतारा घेतला.
----
असा आहे उतारा
साखर उतारा सहा डिसेंबर २०२० अखेरच्या ऊस गाळपाचा साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार सहकार महर्षी ९.४० टक्के सरासरी साखर उतारा, सिद्धेश्वर ५.१ टक्के, श्री विठ्ठल ५.०३, भीमा टाकळी ६.२५, श्री पांडुरंग ९.३३, श्री संत दामाजी ७.६४, वसंतराव काळे चंद्रभागा ७.२८ टक्के, विठ्ठलराव शिंदे ८.६४, कूर्मदास ८.३८, लोकनेते अनगर ८.८५ सासवड माळी ८.४५, विठ्ठल कॉर्पोरेशन ६.७९, लोकमंगल शुगर ७.६, सिद्धनाथ शुगर ७.१२, भैरवनाथ शुगर ७.९८, इंद्रेश्वर शुगर ७.२५, विठ्ठलराव शिंदे २.१, युटोपियन शुगर ७.४९, भैरवनाथ शुगर ८.९९, भैरवनाथ ५.५९, जयहिंद ८.३२, बबनराव शिंदे ९.०९, विठ्ठल रिफायनरी पॉईंट, गोकुळ माऊली ६.९टक्के. साखर उतारा सुरुवातीच्या गळीत हंगामात निघत आहे.
----एफआरपीवर पडणार फरक
गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये सरासरी साखर उतारा ११.२७ टक्के होता. २०१९-२० मध्ये ९.५२ टक्के होता. चालू गळीत हंगामात सुरुवातीला २०२०-२१ मध्ये ८.२५ टक्के साखर उतारा निघत आहे. सलग तीन वर्षे उताऱ्यामध्ये घट होत चालली आहे. त्यामुळे याचा परिणाम पुढील वर्षी एफआरपीवर पडणार आहे.