सोलापूर : दिव्यांगांचे जीवनमान उंचावणे, दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक साहाय्य करणे, दिव्यांगांना त्यांच्या पायावर उभे राहण्याकरिता मदत करणे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करीत असलेल्या सोलापूर महापालिकेत दिव्यांगांना उदरनिर्वाहाचा भत्ताही वेळेवर मिळत नसल्याची तक्रार दिव्यांग संघटनेकडून होत आहे. शिवाय २०१९ -२० या सालातील दिव्यांगांचे १० कोटी रुपये महापालिकेने अखर्चित ठेवल्याचीही माहिती अपंग संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फनिबंद यांनी लोकमतशी बोलताना दिली.
दरम्यान, महापालिकेच्या एकूण बजेटपैकी ५ टक्के निधी हा दिव्यांग, अपंगावर खर्च करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात येते. त्यानुसार सोलापूर महापालिकेनेही तशी तरतूद केली आहे. सोलापुरात ४० ते ७० टक्के दिव्यांगांना ५०० ते ७१ ते १०० टक्के दिव्यांगांना १००० रुपये भत्ता दिला जातो. टक्केवारी कितीही असो शेवटी सर्व दिव्यांग हे दिव्यांगच आहेत, त्यामुळे सर्व दिव्यांग इतर शहराप्रमाणे २ हजार रुपये भत्ता द्यावा अशी आमची मागणी असल्याचेही दिव्यांग संघटनेचे कोषाध्यक्ष अकील शेख यांनी म्हटले आहे. शिवाय दिव्यांगांची नव्याने नोंदणी करण्यासाठी एक विशेष मोहीम महापालिकेच्या वतीने घ्यावी असेही आवाहन संघटनेने केले आहे.
भत्ता वाढविण्यासाठी महापालिकेचा अभ्यास सुरूमध्यंतरी माजी आमदार आडम मास्तर यांनी आयुक्त शीतल तेली-उगले यांची भेट घेतली. या भेटीत दिव्यांगांचा उदरनिर्वाह भत्ता वाढविण्याची मागणी केली. या मागणीचा विचार करून आयुक्तांनी उपायुक्त विद्या पोळ यांना भत्ता वाढविण्यासंदर्भात इतर महापालिकेचा अभ्यास करा अशा सूचना केल्या. इतर महापालिकेची माहिती घेऊनच भत्ता वाढविण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले.असा मिळतोय इतर जिल्ह्यात भत्ता- सोलापूर - ५०० ते १०००- औरंगाबाद - १५०० ते २०००- पुणे - १५०० ते २०००- कोल्हापूर - १५०० ते २०००- लातूर - २००० ते २५००दिव्यांगांची संख्या- एकूण दिव्यांग - ८००० हजार- नोंदणीकृत दिव्यांग - फक्त ३००० हजारदिव्यांगांच्या विविध प्रश्नांसंदर्भात काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी दिव्यांगांना देण्यात येणारा उदरनिर्वाह भत्ता वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. त्या संदर्भात इतर महापालिकेचा अभ्यास करण्यासही संबंधितांना सांगितले आहे. त्या संदर्भात येत्या आठवड्यात आम्ही पुन्हा आयुक्तांना भेटतो, बघू आयुक्त काय निर्णय घेतात ते.-नरसय्या आडम मास्तर,माजी आमदार, सोलापूर