शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

मोठी बातमी; पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या ३० भविकांना विषबाधा 

By appasaheb.patil | Published: December 06, 2022 3:06 PM

या घटनेची माहिती मिळताच नगरपालिका व जिल्हा आरोग्य विभागाची टीम सतर्क झाली आहे

पंढरपूर/सोलापूर : पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आलेल्या मुंबई येथील सुमारे ३० पेक्षा अधिक नागरिकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. चंद्रभागा नदीकाठच्या असणाऱ्या एका हॉटेलमध्ये हे भाविक जेवले होते. जेवणानंतर या भाविकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काही भाविक गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच नगरपालिका व जिल्हा आरोग्य विभागाची टीम सतर्क झाली आहे. शिवाय मंदिर समितीचे पदाधिकारीही या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहेत. दरम्यान, अन्न व औषध विभागाची टीमही पंढरपुरात दाखल झाली असून पोलिस नेमकं काय घडलं याबाबतचा तपास करीत आहे. पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपुरात येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेऊन अनेक भाविक धन्यता मानतात. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, जालना यासह अन्य भागातील लोक दररोज विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. कोणी खासगी वाहनाने प्रवास करतो तर कोणी एसटी, रेल्वेने पंढरपुरात दाखल हाेतात.

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूरhospitalहॉस्पिटल