सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील दौंड सेक्शनमध्ये सुरू करण्यात आलेल्या दुहेरीकरण व राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सिद्धेश्वर, गदग, चेन्नई, यशवंतपूरसह अन्य ५० रेल्वेगाड्या ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड- कुर्डूवाडी सेक्शन दरम्यान (दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक चालणार आहे. हा ब्लॉक २५ जुलै २०२२ पासून ते ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे. या काळात एसईजे नष्ट करणे, टर्न आऊट स्लीपर घालणे, क्रॉसिंग भाग ट्रॅक सर्किटमध्ये बदल करण्याचे काम करण्यात येणार आहे. या गाड्या रद्दीकरणामुळे रुळावर आलेली रेल्वेची प्रवासी सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वेचे प्रवासी आता पुन्हा एसटी बस व खासगी वाहनांकडे वळू लागले आहेत. गाड्या रद्दीकरणामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.
--------
रद्द करण्यात आलेल्या गाड्या...
- - गदग एक्स्प्रेस रद्द
- - सिद्धेश्वर एक्स्प्रेस
- - चेन्नई एक्स्प्रेस
- - सोलापूर - पुणे एक्स्प्रेस
- - हैदराबाद -मुंबई एक्स्प्रेस
- - कन्याकुमारी - पुणे एक्स्प्रेस
- - सिकंदराबाद - राजकोट एक्स्प्रेस
- - काकीनाडा - मुंबई एक्स्प्रेस
- - म्हैसूर - वाराणसी एक्स्प्रेस
- - यशवंतपूर - बिकानेर एक्स्प्रेस
- - काराईकल एक्स्प्रेस
- - मदुराई एक्स्प्रेस
- - चेन्नई एक्स्प्रेस
- - बाडमेर - यशवंतपूर एक्स्प्रेस
- - काकीनाडा टाऊन - भावनगर एक्स्प्रेस
- - कोईमतूर - राजकोट एक्स्प्रेस
- - हुबळी - वाराणसी एक्स्प्रेस
- - म्हैसूर – साईनगर शिर्डी - यशवंतपूर- जयपूर एक्स्प्रेस
- - इंदौर – लिंगमपल्ली एक्स्प्रेस
- - अहमदाबाद – चेन्नई एक्स्प्रेस
- - चेन्नई –केवडिया एक्स्प्रेस
- - पोरबंदर - सिकंदराबाद एक्स्प्रेस
- - ओखा - तुतिकोरीन एक्स्प्रेस
---------
विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या मार्गात बदल
लोकमान्य टिळक टर्मिनल- विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डूवाडी वाडीमार्गे धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – तिरुवनंतपूरम, छत्रपती शिवाजी महाराज- न्यू गोवाहाटी एक्स्प्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डूवाडी मार्गे धावणार आहे. विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनल, तिरुवनंतपूरम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, न्यू गोवाहाटी- छत्रपती शिवाजी महाराज एक्स्प्रेस ही व्हाया वाडी, कुर्डूवाडी, मिरज, पुणेमार्गे धावणार आहे.
-----------
अन् मोबाईल संदेश आला
मंगळवारी दुपारी एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट काढलेल्या प्रवाशांना गाडी रद्द करण्यात आल्याचा संदेश मोबाईलवर आला. त्यानंतर प्रवाशांनी तत्काळ आपले नियोजन बदलून थेट एसटी व खासगी बसने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एसटी व खासगी गाड्यांचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे.