आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहरापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चिंचोळी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये असलेल्या ४५० ते ५०० कंपन्यांच्या माध्यमातून ४० ते ४५ हजार कामगारांना रोजगार मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. या वसाहतीत परिसरातील सर्व सेवासुविधा पुरविण्यात येत असून यासाठी औद्योगिक वसाहत असोसिएशनचा मोठा वाटा आहे.
कोंडी, चिंचोली व पाकणी गावांच्या जमिनीवर चिंचोळी औद्योगिक वसाहत उभारली असून आजही विस्तारत आहे. १९९२ मध्ये या परिसरात एमआयडीसी होणार याबाबत चर्चा होती. १९९२ ते २०१३ सालात या परिसरात १०० कंपन्यांची उभारणी झाली होती. या परिसरात ४०० हून अधिक कंपन्या सुरू आहेत. बालाजी अमाईन्स, प्रिसिजन कॅमशॉफ्टस, लक्ष्मी हायड्रोलिक्स, थरमॅक्स लिमिटेड, कोठारी, बंग डाटा लिमिटेड, राठी, सिमको, लोकमंगल, व्यंकेश आदी विविध कंपन्या उत्पादनात अग्रेसर आहेत.-------------
औद्योगिक वसाहतीवर एक नजर...
- सोलापूर शहरापासून १६ किलोमीटर अंतर,-अडीच हजार एकरावर एकूण ४५० कंपन्या उभारल्या
- या कंपन्यांमध्ये ४० ते ४५ हजार कामगारांना रोजगार,- देश-विदेशात उत्पादन पोहोचविणाऱ्या अनेक नामांकित कंपन्या कार्यरत,
- सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्याेगिक वसाहत-----------
या आहेत प्रमुख सेवासुविधा
- पोस्ट ऑफिस- सिटी बस सेवा- स्वतंत्र पोलीस ठाणे
- रस्ते, वीज, स्ट्रीट लाईट- बँकिंग सुविधा
- डिस्पेन्सरी सुरू करण्याचा मानस----------
चिंचोळी औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतंत्र रुग्णालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली असून लवकरच चिंचोळी वसाहतील डिस्पेन्सरी (क्लिनिक) सुरू होणार आहे. शिवाय आम्ही सर्व कंपन्यांना सर्व सेवासुविधा पुरविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो.- राम रेड्डी, अध्यक्ष, चिंचोळी औद्योगिक वसाहत.
-----------चिंचोलीमधील उत्पादन देश-विदेशात
चिंचोळी वसाहतीमध्ये उत्पादन होणाऱ्या अनेक कंपन्यांचा माल देश-विदेशात पोहोच होत आहे. त्यामुळे चिंचोळी एमआयडीसीचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. एवढेच नव्हे तर अनेक कंपन्यांचे उत्पादन चांगल्या प्रकारचे असल्याने सोलापूरचे नाव इतर देशात व विदेशात आदरानं घेतले जाते.----------
भविष्यात नवे उद्योग येतील...
चिंचोळी एमआयडीसी परिसरात भविष्यात आणखीन नवनवे उद्योग येणार आहेत अशी असोसिएशनला आशा आहे. सोलापुरातील सर्वच घटकांमधील लोकांनी उद्योजकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. शिवाय उद्योग सोलापुरात येतील यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.