सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी चार वाजता जाहीर करण्यात आला. यात सोलापूर जिल्ह्यातून ५०,३०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातून ९९.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून बारावीसाठी ५० हजार ३९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यातील ९७ विद्यार्थी नापास झाले आहेत. अशी माहिती माध्यामिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली.
यंदा राज्यभरातून ९९.८४ टक्के मुली तर ९९.७४ टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आले होते. यंदा दहावीचा निकालाप्रमाणे बारावीचा निकाल मागील वर्षीच्या गुणांवर आधारित असणार आहे. यात दहावीच्या गुणांना ३० टक्के, ज्यात दहावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच इयत्ता अकरावी मधील तीस टक्के गुण उर्वरित बारावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित असणार आहे.