सोलापूर : खुनी हल्ल्याप्रकरणी विडी घरकुल, कुंभारी (ता.द.सोलापूर) येथील एकास सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी ७ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.
अब्दुल जब्बार अब्दुल गफुर शेख (वय ५२, रा. विडी घरकुल, कुंभारी, ता. द. सोलापूर) असे सक्तमजूरी शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी अब्दुल याने उस्मान शेख याच्यावर खुनी हल्ला केला होता. ही घटना १ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती. यात आरोपी अब्दुल याने फिर्यादी व त्याचा लहान भाऊ शहानवाज असे दोघांवर चाकूने, डोक्यात व तोंडावर सपासप वार केले होते. त्याबाबत वळसंग पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एस. भावीकट्टी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले.
या प्रकरणात सरकार पक्षातफेर् १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी अब्दुल जब्बार अब्दुल गफुर शेख यास सात वर्षे सक्तमजूरीची शिक्षा व दोन हजार रूपये दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनाववली आहे. यात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून ॲड. ए.जी. कुलकर्णी, ॲड. डी. एम. पवार, ॲड. शितल डोके व ॲड. जी.आय. रामपुरे यांनी तर आरोपीकडून ॲड. ए.एन.शेख यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एस. भावीकट्टी तर कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हेड काॅन्स्टेबल शितल साळवे यांनी काम पाहिले.