सोलापूर : कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा चिमणी पाडकामाबाबत उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या अवमान याचिकेची सुनावणी न्या. एस. जे. काटावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्यासमोर ६ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे याचिकाकर्ते डॉ. संदीप आडके यांनी म्हटले आहे.
^^^
मुख्यमंत्र्यांकडे मेलद्वारे तक्रार
नगरविकास विभागाने पाडकामाला खोडा घालण्याचे पत्र त्वरित मागे घ्यावे अशी मागणी डॉ. आडके यांनी ईमेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी केली होती. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ आदेश देण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.