सोलापूर : जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकाºयाचा कोरोनाची बाधा झाल्याने शनिवारी मृत्यू झाला आहे.
५५ वर्षीय असलेले अधिकाºयाला जिल्हा परिषदेत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षात ड्युटी देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी येथील नियंत्रण कक्ष बंद करण्यात आले आहे पण संबंधित अधिकाºयाला पंधरा दिवसापूर्वी त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्या ठिकाणी त्यांचे टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर दुसºया एका रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेतील एका अधिकाºयाचा कोरोनाने बळी गेल्यामुळे प्रशासन हादरले आहे.