सोलापूर : सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह मोहिते-पाटील यांची नियुक्तीच निवड करण्यात आली. गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी सोलापुरातील काँग्रेस भवनात जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या पदभार स्वीकार कार्यक्रमावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व जमावबंदीचा आदेश असतानाही मोठया प्रमाणात गर्दी केल्याने काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह १२ प्रमुख नेत्यांवर सोलापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेल रोड पोलिस ठाण्यातील कर्मचारी गुलाबबाबा पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्यानुसार अर्जुनराव पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर संजय हेमगडडी, अमोल पुजारी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अशोक देवकते , युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे, बाबा करगुळे, विनोद भोसले , बसवराज बगले , हेमा चिंचोळकर, धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 143, 188, 269, 336 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (बी) सह भारतीय साथरोग अधिनियम 1897 चे कलम 3 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.