सोलापूर - तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर १४ व्यापारी गाळे उभा करुन शाळेचा रस्ता बंद केला, त्यामुळे शाळाच बंद आहे. निवेदने देऊनही अतिक्रमण निघत नसल्याने व शाळेचा रस्ता रिकामा होत नसल्याने सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी शाळा भरवली. दोन दिवसात अतिक्रमण काढून घेण्याचा शब्द मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला.
मोठी बातमी; अतिक्रमणामुळे तिऱ्हेच्या विद्यार्थ्यांनी झेडपीत सीईओसमोरच भरवली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 1:25 PM