सोलापूर : प्रवाशांची मागणी व वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेच्या प्रशासनाने साेलापूर विभागातील बार्शी टाऊन, शेगाव, जलंब, तारगाव, जेऊर, केम आणि माढा या स्थानकांवर गाड्यांना प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा थांबा सहा महिन्यांसाठी असणार आहे.
बार्शी टाउन स्टेशनवर पनवेल-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस व हुजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस थांबणार आहे. शेगाव स्टेशनवर पुरी-अजमेर सुपरफास्ट (द्वि-साप्ताहिक) एक्सप्रेस, अजमेर - पुरी सुपरफास्ट (द्वि-साप्ताहिक) एक्सप्रेस, हुजूर साहिब नांदेड- श्री गंगानगर एक्सप्रेस, श्री गंगानगर- हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस थांबणार आहे. जलंब स्टेशनवर मुंबई- हावडा मेल एक्सप्रेस, हावडा - मुंबई मेल, सुरत-अमरावती सुपरफास्ट, अमरावती - सूरत- सुपरफास्ट थांबणार आहे. तारगाव स्टेशनवर मुंबई- श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, गोंदिया - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस थांबणार आहे.
जेऊर, केम, माढा स्थानकावर सिध्देश्वरला थांबा
जेऊर स्टेशनवर भुवनेश्वर - मुंबई कोणार्क एक्सप्रेस तर केम स्टेशनवर कन्याकुमारी - पुणे एक्स्प्रेस, माढा स्टेशनवर सोलापूर- मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे.