सोलापूर : बंदिस्त घरे / दुकाने फोडणारी सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या मोठया कारवाईमुळे २१ घरफोडीचे व २ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड झाले असून १५ लाख ६१ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सोलापूर जिल्हयातील उघडकीस न आलेल्या घरफोडी गुन्हयाबाबत पोलीस अधीक्षक तेजखी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी गुन्हे आढावा बैठकीत सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना सुचना दिल्या होत्या.
सदर सुचना प्रमाणे सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. नमुद पथकाने सोलापूर ग्रामीण जिल्हयातील उघडकीस न आलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्हयावर लक्ष केंद्रीत करून गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या सहयाने आरोपी निष्पन्न करण्यास सुरुवात केली. माळशिरस पोलिस ठाण्याकडील नोंद असलेल्या एक गुन्हा उघडीस आणला आहे. यात ४ लाख ६७ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असताना गुन्हयातील आरोपी हे पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे येणार असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने सपोनि धनंजय पोरे व त्यांचे पथकाने सापळा रचून दोन आरोपींना खेडभोसे ता. पंढरपूर येथून ताब्यात घेतले. सदर गुन्हयातील सहभागा बाबत आरोपींनी कबुली दिली असुन त्यांच्याकडे केलेल्या सखोल व कौशल्यपूर्ण तपासाअंती आरोपीतांनी त्यांचे अन्य तीन साथीदारांसोबत जिल्हयातील अनेक भागात बंदिस्त घरे/ दुकाने यांचे दरवाज्याचे कोयंडे तोडुन, खिडकीचे ग्रील उचकटुन, कापुन घरफोडी व चोरी केली असल्याचे सांगितले.
दरम्यान, अटक आरोपींकडून एकुण २१ घरफोडीचे गुन्हे व २ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण १५ लाख ६१ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहा. पोलीस उपनिरीक्षक बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ सलीम बागवान, आबासाहेब मुंढे, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोना रवि माने, मपोहेकॉ मोहिनी भोगे, मपोना अनिसा शेख, पोना व्यंकटेश मोरे, सायबर सेल तसेच अंगुली मुद्रा विभागाचे सपोनि गळवे, पोहेकॉ सादुल, पोकों छत्रे यांनी बजावली आहे.