सोलापूर: जिल्हा परिषद मराठा सेवा संघ कर्मचारी शाखेतर्फे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला महिला कर्मचाऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,नितीन नकाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, स्मिता पाटील, ईशाधीन शेळकंदे, जावेद शेख, मुख्य लेखाधिकारी अजयसिंह पवार, उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता पांडुरंग कदम, सुनील कटकधोंड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. किरण लोहार यांनी प्रास्ताविक केले. राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर अकोलेकाटी शाळेतील उपशिक्षिका सरस्वती पवार यांचे यावेळी व्याख्यान झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या मार्गदर्शनात राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील प्रसंग विशद केले. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
अध्यक्ष कांबळे यांचे रक्तदानया निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा कर्मचारी जिल्हाध्यक्ष टी. आर. पाटील, शाखा अध्यक्ष अविनाश गोडसे, राजेंद्र वारगर,अनिल जगताप, अनिल पाटील, सुधाकर माने- देशमुख, विकास भांगे, वासुदेव घाडगे, चेतन भोसले, सविता मिसाळ, लक्ष्मी शिंदे, राम जगदाळे, विशाल घोगरे, अविनाश भोसले, सचिन साळुंके, नितीन जाधव, जयंत पाटील, अश्विनी सातपुते, रोहित घुले, हरी देशमुख, गोपाळ शिंदे, निलेश देशमुख, शिवाजी गवळी यांनी परिश्रम घेतले.