मोठी बातमी; युक्रेनमधून कोरवलीची कन्या सलोनी गेंगाणे भारतात सुखरूप पोहचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 04:03 PM2022-02-27T16:03:05+5:302022-02-27T16:03:11+5:30

आई-वडिलांनी सुटकेचा श्वास सोडला

Big news; Korvali's daughter Saloni Gangane arrived safely in India from Ukraine | मोठी बातमी; युक्रेनमधून कोरवलीची कन्या सलोनी गेंगाणे भारतात सुखरूप पोहचली

मोठी बातमी; युक्रेनमधून कोरवलीची कन्या सलोनी गेंगाणे भारतात सुखरूप पोहचली

googlenewsNext

कामती : मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील विद्यार्थिनी सलोनी अजय गेंगाणे ही युक्रेन येथे उच्च शिक्षण घेत होती.रशिया-युक्रेन या दोन राष्ट्रामध्ये युध्दामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी पालकांची घाल-मेल सुरू होती. भारत सरकारने जबाबदारी घेऊन युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्याची हमी घेतली आहे. आज दिल्ली येथे २१७ विद्यार्थी आणले आहेत. यामध्ये कोरवली येथील  सलोनी ही एम.बी.बी.एस चे शिक्षण घेणारी विद्यार्थीनीही आली आहे. मुलगी भारतात आल्याने आई-वडिलांनी सुटकेचा श्वास घेतला.

भारतातील विमान रोमानियातून युक्रेनमध्ये अडकलेले २१७ विद्यार्थीना घेऊन आले आहे. रशिया-युक्रेन यांच्यात अचानक युद्ध सुरू झाले आहे. या युध्दामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेंगाणे परिवारला माहिती होताच त्यांनी मुलीशी संपर्क साधला होता. मुलीकडून योग्य माहिती मिळत होती; परंतु युद्धजन्य परिस्थितीमूळे कुटुंबीयावर संकटाचे सावट होते. दरम्यान आज दिल्ली येथे सलोनी इतर विद्यार्थी आल्याने पालकांचे संकट कमी झाल्याचं दिसत आहे.दरम्यान सलोनी ह्या विद्यार्थीनीने युक्रेन ते रोमानिया प्रवास एस.टी बसने केला आहे. पुढे भारतीय विमानाने दिल्ली येथे आली आहे.सोलापूर जिल्ह्यातील एकूण पाच-सहा जण आल्याची बातमी आहे.

विद्यार्थ्यांना भारतात आणायचा सर्व खर्च भारत सरकार करत आहे. सर्व विद्यार्थ्यांना दिल्ली येथे महाराष्ट्र सदन येथे राहण्याची सोय केली आहे. कोरवली (ता.मोहोळ) येथील अजय गेंगाणे हे पुणे येथील हवेली तालुक्यात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये मेडिकल सीईटीमध्ये सलोनीचा युक्रेन येथील एक विद्यापीठात नंबर लागला होता.ती डिसेंबरमध्येच युक्रेनला गेली होती. पुण्याला आज येण्याची शक्यता आहे. एकंदरीत आज भारतातील २१७ विद्यार्थीच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Big news; Korvali's daughter Saloni Gangane arrived safely in India from Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.