पंढरपूर : घरामध्ये लपवून ठेवलेल्या सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवले असल्याची तक्रार गोपाळपुर (ता. पंढरपूर) येथील महिलेने मंगळवारी पोलीस ठाण्यात दिली होती. ही चोरी तक्रारदार महिलेचा मुलगा ओंकार प्रमोद जाधव (वय २०, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर) हा याने केल्याचे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले.
निर्मला प्रमोद जाधव ( वय ५०, रा. मातोश्री नगर गोपाळपूर, ता. पंढरपूर) यांनी सोने-चांदी व पैसे एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवले होते. तो डब्बा घरामधील कापटाखाली ठवला. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून सोने-चांदी ठेवलेल्या डब्बा चोरून नेहला अशी तक्रार निर्मला जाधव यांनी तालुका पोलिस ठाण्यांमध्ये २२ डिसेंबर रोजी केली होती. या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक किरण अवचार यांनी तपास चक्रे फिरवली. त्यांनतर पोलीस पथकाला घटनास्थळी पाठवले.
यांनतर निर्मला जाधव यांच्या घरातील इतर लोक बाहेर गेले असताना ओंकार प्रमोद जाधव (वय २०, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर) हा घरात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. ओंकार जाधव याला विश्वासात घेऊन सखोल तपासणी केली असता त्याने मोटरसायकलच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी घरातून पैसे व दागिने चोरल्याचे कबूल केले. त्यामुळे त्याला पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले.