सोलापूर : आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. आतापर्यंत ८० टक्के शिक्षकांचे लसीकरण झाले असून, २० टक्के शिक्षकांचा दुसरा डोस शिल्लक आहे.
कोरोनानंतर शाळा सुरू झाल्या. तत्पूर्वी सर्व शिक्षकांना लसीकरण करणे आवश्यक करण्यात आले होते. त्यामुळे ८० टक्के शिक्षकांनी दोन डोस घेऊन शाळा गाठली. त्याचवेळी २० टक्के शिक्षकांना दुसरा डोस मिळाला नाही, तरीही त्यांनी शाळेला सुरुवात केली आहे.
दोन्ही डोस घेतलेल्यांनी टेस्ट करणे गरज नसल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. एक डोस घेणाऱ्यांना देखील टेस्टिंग आवश्यक केली होती. मात्र, पहिल्या दिवशी सर्वांनीच टेस्टिंग केले नाही. बरेच जण विनाटेस्टिंग शाळेवर गेले होते.
संमती दिलेल्या ३१७ शाळांमधील शिक्षकांचे लसीकरण जवळपास पूर्ण झाले असून, उर्वरित शिक्षकांचे लसीकरण लस उपलब्ध होताच पूर्ण केले जाईल.
- भास्करराव बाबर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
- जिल्ह्यातील शाळा: ५०७४
- सुरू झालेल्या शाळा: ३१७
- आठवी ते बारावीचे विद्यार्थी: ३,५७,०८५