पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेची आषाढी यात्रा कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्राथमिक स्वरुपात होत आहे. यामुळे यंदाच्या वर्षी बंदोबस्तासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कोरोना चाचणी करुन निरोगी पोलीसच आषाढीचा बंदोबस्त करणार आहेत, अशी माहिती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिक्षक विक्रम कदम यांनी दिली.
आषाढी यात्रा भरली तरी गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून जिवीतहाणी होऊ नये. गर्दीमुळे चेंगरा चेंगरी होऊ नये. वारकऱ्यांची वारी सुरक्षित व्हावी, यासाठी हजारो पोलीसांचा बंदोबस्त पंढरपुरात लावण्यात येतो. आता कोरोना संसर्गजन्य रोगामुळे आषाढी यात्रा मोजक्याच भाविकात होत आहे. तरीही पंढरपुरात गर्दी होऊ नये, यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यात हजारो पोलीसांचा बंदोबस्त लावण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली आहे.
मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील भाविकांना पंढरपुरात येण्यापासून रोखण्यासाठी तीन स्तरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा हद्द, तालुका हद्द व शहर हद्दीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
यासाठी १७०० पोलीसांनी शहर पोलिस ठाण्यात रिपोटींग केले आहे. या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये केवळ ४ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी व गावी उपचारासाठी पाठवले असल्याची माहिती विक्रम कदम यांनी दिली.
बंदोबस्तासाठी पोलीसांचे ऑनलाईन रजिस्टर
स्वेरी महाविद्यालयाने आषाढी यात्रेच्या पोलीस बंदोबस्ता ऑनलाईन पध्दतीचे मोबाईल ॲप तयार केले आहे. यामध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांची नोंद होते. त्यांना या ॲपद्वारे बंदोबस्त पाँईंट, संबंधीत अधिकारी व इतर सुतना दिल्या जात आहेत. शुक्रवारपर्यंत १६०० च्या आसपास पोलीसांची नोंद करऱ्यात आली आहे. पुढील दोन दिवसात अणखी पोलीस यात्रेसाठी येणार असल्याची माहिती सपोनि. कपिल सोनकांबळे यांनी दिली.
पोलीस ठाण्यातच कोरोना तपासणी केंद्र
आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांच्या माध्यमातून इतर कोणाला कोरोनाची लागण होऊ नये. यासाठी प्रत्येक पोलीसांची कोरोनाची चाचणी करण्यात येत असून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातच कोरोना तपासणी २ केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बंदोबस्त वाटपासाठी एक केंद्र तयार करण्यात आला आहे. तसेच पोलीसांना आरोग्य किट वाटप करण्यासाठी देखील केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरिक्षक अरुण पवार यांनी दिली.