शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

मोठी बातमी; करमाळा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास ठार मारण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 1:18 PM

लोकमत ब्रेकींग बातमी

सोलापूर : तालुक्यातील वनपरिक्षेत्र आष्टी अंतर्गत सुरुडी , किन्ही , मंगरुळ , पारगाव जो . ता आष्टी जि . बीड व वनपरिक्षेत्र पाटोदा अंतर्गत मौजे जाटवड परिसरात तसेच सोलापूर वनविभागातील मोहोळ वनपरिक्षेत्रातील मौजे लिंबेवाडी ता . करमाळा या परिसरात नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत आहे. यामुुळे मानवी जिवितास धोकादायक ठरलेल्या बिबटयाला पिंजराबंद करण्यास तसेच गरजेप्रमाणे तज्ञाचे उपस्थितीत बेशुध्द करून बंदीस्त करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय जेरबंद, बेशुद्ध करणे शक्य न झाल्यास त्यास ठार मारण्याची परवानगीचा आदेश मुख्य वन्य जीवरक्षक तथा प्रधान मुख्यवन संरक्षक महाराष्ट्र राज्याचे नितिन काकोडकर यांनी दिला आहे. याबाबत आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस यांनी पत्र व्यवहार केले होते असे सांगण्यात आले.

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी जीव गमावला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी असून बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरिकांनी बिबट्यास ठार करण्याची मागणी केली होती. दिलेल्या आदेशात नमूद आहे की, बिबटयाला जेरबंद, बेशुध्द करणे शक्य न झाल्यास सदर बिबटयाला अधिक मनुष्य हानी टाळण्याच्या दृष्टीने ठार मारण्याची परवानगी देण्यात येत आहे . सदर कार्यवाही करण्यास मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) औरंगाबाद आणि मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) पुणे यांना व त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी / कर्मचारी / पोलीस अधिकारी / इतर व्यक्ती यांना अधिकृत करण्यात येत आहे . सदर आदेश  ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वैध राहिल. शक्यतो सर्व पर्यत्न करून बिबटयाला जेरबंद / बेशुध्द करण्यास प्राधान्य द्यावे . सदर बिबटयाला ठार मारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पारितोषक जाहिर करण्यात येऊ नये. आवश्यकतेनुसार Sniffer dog ची सहायता घेण्यात यावी . सदर बिबटयास जेरबंद / बेशुध्द आणि ते शक्य न झाल्यास त्याला ठार करण्याच्या कार्यवाहीला एकंदर नियोजनाकरिता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) पश्चिम , मुंबई हे समन्वय अधिकारी राहतील . सदर बिबट बंदीस्त झाल्यास त्याला मानवी संपर्कापासून दुर ठेवण्याची संपुर्ण दक्षता घेण्यात यावी. सदर बिबटयाची तज्ञ पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडून स्वास्थ्य तपासणी करून पर्यावरण व वन मंत्रालय , भारत सरकार यांचे मार्गदर्शक सुचनेत नमुद केल्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी. उपद्रव ग्रस्त क्षेत्रात पुन : श्च अनुचित घटना घडणार नाही, या करिता नियमित गस्त, कॅमेरे ट्रॅप्सद्वारे सनियंत्रण, बिबटच्या अस्तित्वदर्शक सर्व पुरावे गोळा करण्याची कामे तसेच स्थानिक ग्रामस्थांमध्ये मानव वन्यजीव संर्घष टाळण्यासाठी जनजागृती करणे व बिबटयाच्या हालचालीची माहिती तात्काळ प्राप्त करण्यास आवश्यक जाळे उभारणे याबाबत कार्यवाही योग्य कालावधी पर्यंत कार्यरत ठेवण्यात यावी असे दिलेल्या आदेशात नमूद आहे.

Highlights

टॅग्स :SolapurसोलापूरTigerवाघkarmala-acकरमाळा