सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून धावणारी बंगळुरू - अहमदाबाद एक्सप्रेस रेल्वे गाडीत सोमवारी पहाटे दरोडा पडला. या घटनेत चोरट्यांनी महिला प्रवाशांना मारहाण करून ५० तोळे सोने लुटल्याची प्राथमिक माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली.
दरम्यान, ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बोरोटी- नागणसूर हद्दीत घडली. याबाबत संबंधित महिला प्रवाशांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची प्राथमिक माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली.