सोलापूर : शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दादाजी भुसे कृषी मंञी यांचा सोलापूर दौरा होता. या दौऱ्यात पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी कृषी मंञी दादा भुसे यांच्याकडे अक्कलकोट तालुक्यातील २०२० चा शासकीय अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामानुसार ४४९३० शेतकऱ्यापैकी ३८००० शेतकरी वंचित लोकांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली, तसेच या वर्षाचा पिक विमा शेतकऱ्यांना त्वरित मिळावे म्हणून मंत्री भुसे यांच्याकडे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी मागणी केली.
यावर लवकरच तोडगा काढुन शेतकऱ्यांना योग्य पीक विमा नुकसान भरपाई मिळवून दिले जाईल, असे ठोस आश्वासन कृषी मंञी दादा भुसे यांच्याकडून सर्व शिवसेना जिल्हा प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी यशस्वी पाठपुरावा केला.
यावेळी जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे, गणेश वानकर, शहर प्रमुख गुरूशांत धुतरगाकर, उपजिल्हाप्रमुख भिमाशंकर मैञे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निरंजन बोधूल, राज पांढरे, बसवराज गुजा, नितीन मोरे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.