राकेश कदम
साेलापूर -राज्याच्या पर्यावरण विभागाने कार्बनमुक्तीसाठी हाती घेतलेल्या ‘कार्बन न्यूट्रल’ प्रायाेगिक कार्यक्रमात मुंबई, नाशिक, औरंगाबादसाेबत साेलापूरचा समावेश झाला आहे आहे. यातून शहरात आगामी दिवसांत इलेट्रिक वाहनांचा वापर वाढविणे, साैर ऊर्जा निर्मितीला प्राेत्साहन देणे, घनकचरा, सांडपाणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिका प्रशासन आणि ‘डब्ल्यूआरआय इंडिया’ संस्थेने ‘साेलापूर क्लायमेट ॲक्शन प्लॅन’ तयार करीत आहे.
राज्यातील माेठ्या शहरांमध्ये कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन, नायट्राेजनचे प्रमाण वाढत आहे. यातून पाणी, माती, वायू प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. शिवाय तापमान वाढ डाेकेदुखी ठरत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मागील वर्षी ‘कार्बन न्यूट्रल’ उपक्रमाची घाेषणा केली हाेती. यातंर्गत चार शहरांमध्ये प्रायाेगिक तत्त्वावर विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, डब्ल्यूआरआयचे प्रकल्प व्यवस्थापक मेहुल पटेल यांनी महावितरण, आरटीओ, पाेलीस अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांची बैठक घेतली. शहरात काेणत्या घटकातून जास्त प्रदूषण हाेते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययाेजना कराव्या लागतील याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी ‘साेलापूर क्लायमेट ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येत आहे.
--
बससेवा पुन्हा सुरू हाेण्याची आशा
डब्ल्यूआरआयचे प्रकल्प अधिकारी मेहूल पटेल म्हणाले, ऊर्जा निर्मिती करताना काेळशाचा वापर हाेताे. यातून हवेचे प्रदूषण वाढते. वाहनांमुळे हवेचे माेठे प्रदूषण हाेते. घनकचरा व सांडपाण्याच्या गहाळ नियाेजनामुळे मातीचे प्रदूषण वाढत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध कामे हाेतील. शासन यासाठी विशेष निधी देऊ शकते. खासगी वाहने बंद करून सार्वजनिक इलेक्ट्रिक बस वाहतूक सुरू करण्यास आम्ही सांगणार आहाेत.
--
कारखान्यांवर येईल नियंत्रण
शहरात धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. याचे अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर दरराेज अपलाेड हाेता. स्मार्ट सिटी, महापालिकेच्या अर्धवट कामांमुळे धुलिकण वाढले आहेत. एमआयडीसीतील रासायनिक कारखाने, साखर कारखान्यामुळे वायू, भूमीप्रदूषण वाढल्याचे महापालिकाच सांगते. यावरही उपाययाेजना हाेऊ शकतात.
--
महापालिकेत आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू हाेईल. इतरांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्राेत्साहन दिले जाईल. २०५० वर्षाचा विचार करून क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार केला जाईल. कार्बनमुक्तीच्या कामात महापालिकेची भूमिका महत्त्वाची असेल.
- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.