सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून अर्थात एसटी गाड्यांमधून प्रवास करताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला झटका बसणार आहे. आज मध्यरात्रीपासून एसटीच्या प्रवासभाड्यात १७.१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबाबत नुकतेच अध्यादेश काढण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी तिकिटाच्या दरात वाढ करणे हाय पर्याय प्रशासना समोर होता. यामुळे तिकीट दरवाढ होणार जवळपास निश्चित मानले जात होते. याबाबत सोमवारी दरवाढीच्या आदेश काढण्यात आला आहे. यामुळे आता शंभर रुपयांना जवळपास १७ रुपये १७ पैसे जास्त द्यावे लागणार आहे. अर्थात जर पुण्याला जायचे असेल पूर्वी जवळपास तीनशे पंचवीस रुपये तिकीट होते. आता प्रवाशांना यासाठी साठ रुपये जादा मोजावे लागणार आहे.