शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
"अशा घोषणा लोकांना आवडणार नाहीत"; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध
3
"काही मशिनमध्ये गडबड होण्याची शक्यता! असं परदेशी माणूस म्हणतोय"; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
4
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
5
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
6
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
8
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
9
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
10
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
11
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
12
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
13
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
14
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
15
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
16
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
17
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
19
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
20
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

मोठी बातमी! जी २० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार पंढरपूरची आषाढी वारी

By appasaheb.patil | Published: June 01, 2023 7:18 PM

आषाढीच्या काळात जी २० चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे.

सोलापूर : वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. हीच सांस्कृतिक परंपरा यंदा जी २० चे प्रतिनिधी पाहणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.

आषाढीच्या काळात जी २० चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे. त्यांना पंढरपुरची वारी आणि त्या अनुषंगाने या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीतील या वैशिष्ट्यपूर्ण अशा वारीचे दर्शन घडवा, त्यासाठी उत्तम नियोजन करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधीसह पुणे, सोलापूरचे अधिकारीही उपस्थित होते.

वारीच्या नियोजनासाठी पालखी मार्ग आणि पंढरपूरसह, वारी मार्गावरील विविध ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रत्यक्ष भेटी देऊन नियोजनाची पाहणी करणार आहेत. यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पालखी मार्ग तसेच वारीच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावर्षी वारीकरिता 60 टक्क्यांनी अधिकचे मनुष्यबळ तसेच पाण्याकरिता टँकर्सची संख्याही दुप्पट करण्यात येत असल्याची माहिती राव यांनी दिली. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाच्या सचिव सोनिया सेठी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनुटिया आदी उपस्थित होते.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022