सोलापूर : करमाळा तालुक्यात काल रात्री झालेल्या दमदार पावसामुळं केम गावाच्या आजूबाजूच्या दहा ते पंधरा गावाचा रात्री झालेला अचानक अतिवृष्टी पावसामुळे संपर्क तुटला आहे.
केम गावाला जोडणाऱ्या चारी बाजूचे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. रेल्वे पुलाखालील रस्ता पाण्याने वाहत असल्याने त्यामुळे उड्डाणपुलाची मागणी करून देखील आजतागायत त्या उड्डाणपुलाला यश आलेले नाही, त्यामुळे केम गावातील जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल व इतर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे भयंकर नुकसान झाले आहे. किराणा दुकानातील किराणा माल कृषी दुकानातील खत शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे. त्वरित पंचनामे चे आदेश देऊन नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली आहे.