सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेेतून ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. तलावाच्या आतील बाजूने नैसर्गिक पद्धतीनेे दगड लावण्याससाठी तलावातील पाणी बाहेर सोडण्यात येत आहे.
स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंंगळे-पाटील म्हणाले, या योजनेतून तलाव व परिसराच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दहा दिवसांत लायटिंग व इतर किरकोळ कामे पूर्ण होतील. हा रस्ताही फिरण्यासाठी मोकळा होईल. तलावाचे संवर्धन करण्यासाठी आतील बाजूने भोवताली नैसर्गिक पद्धतीने सुमारे ७०० मीटर बेसाल्ट दगड लावण्यात येतील. सिद्धेश्वर देवस्थान समितीचे या कामात सहकार्य मिळत आहे. तलावातील पाणी कमी करून लवकरच कामाला सुरुवात होईल. दीड महिन्यात हेे काम पूूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. संंमती कट्ट्याजवळ रस्ता काँक्रिटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे.
दोन कोटी रुपयांची बचत
तलाव परिसर सुशोभीकरणाच्या कामात दोन कोटी रुपयांची बचत झाली आहे. तलावामध्ये लाइट अँड साऊंड शो उभारण्याची वर्क ऑर्डर दिली आहे. लॉकडाऊनमुळे काम सुरू झाले नाही. १५ जूननंतर या कामालाही सुरुवात होईल, असे ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.