पंढरपूर : चंद्रभागा नदीच्या पुलावर पुराचे पाणी कमी झाले आहे. असे असले तरी काही कालावधीसाठी पुल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर मध्ये पूर आला होता. चंद्रभागा नदी वरील तिन्ही पुलावर पुराचे पाणी होते. यामुळे शहरात येणारी व शहरातून जाणारे पूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. परंतु शनिवारी पहाटे अहिल्यादेवी पुलावरील व जुना दगडी फुला शेजारील नवीन पुलावरील पाणी कमी झाले आहे. मात्र पाण्यात वाहून आलेले वनस्पती, लाकडे, जनावरे पुलावर अडकून पडले आहेत.
तसेच हा पूल वाहतुकीसाठी वापरणे योग्य आहे की नाही याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. मुलाच्या तपासणी नंतरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.