पंढरपूर : सरकोली (ता. पंढरपूर) येथील सोमनाथ विठ्ठल भालेराव (वय ३०) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मात्र पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी वाळू उपशासाठी व वाळु वाहतुकीला परवानगी देण्याकरता हप्ता घेऊनही कारवाई केली. यामुळे सोमनाथने आत्महत्या केलाचा आरोप सोमनाथच्या नातेवाईकांनी केला आहे.
खटकाळ वस्ती (सरकोली) येथील द्राक्षेच्या बागेत सोमनाथ विठठल भालेराव याने टू फोर डी नांवाचे विषारी औषध प्रशान आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याला प्रथम सिकंदर टाकळी कारखान्यावरील रुग्णालयात नेहण्यात आले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी सोमनाथला पंढरपुरातील रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पंढरपुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल केले त्यावेळी तेथे प्राथमिक उपचार केले नंतर डॉक्टरांनी सोलापुर किंवा अकलुज येथे पुढील उपचाराकरीता नेण्यास सांगितले. त्यामुळे रुग्णवाहिकितुन त्याला अकलुज नेले होते. त्यावेळी वाहन बाहेरच असताना डॉक्टरांनी बाहेरच तपासुण मयत झाले असल्याची सांगितले.
आबासाहेब विठ्ठल भालेराव (वय ३५, रा.सरकोली, ता.पंढरपुर, जि. सोलापूर) यांनी सोमनाथकडून एका अधिकारी व दोन पोलीसांवर वाळु चोरीसाठी पैसे घेतल्याचा आरोप केला. आबासाहेब विठ्ठल भालेराव यांनी मयत सोमनाथ विठ्ठल भालेराव यांचा मृतदेह पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आणला. संबंधित पोलिसांवर कारवाई करा म्हणून त्या ठिकाणी आंदोलन सुरू केले.
माझ्या भावाला वाळु काढण्यास प्रवृत्त करणारे देखील पोलीसच आहेत. माझ्या भावाने पोलीसांमुळेच आत्महत्या केली आहे. यामुळे संबंधीत पोलीसांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सोमनाथचा मृतदेह पोलीस ठाण्यातून हलवणार नाही, असे म्हणून आबासाहेब भालेराव व इतर तरुणांनी बराच वेळ मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवला होता. पोलीसांच्या आश्वासनानंतर मृतदेह हलवण्यात आला.
--------------------------------
सोमनाथ भालेराव ऊर्फ भालके यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. पोलीसांनी कारवाई केल्यामुळे सोमनाथ आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. पोलीसांवर करावाई करा अशी मागणी करत, त्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर करावाई करु.- किरण अवचर, पोलीस निरिक्षक