सोलापूर : ग्रामपंचायतीशी संलग्न कर्मचारी आणि पंचायत समिती स्तरावरील कर्मचाºयांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक्स प्रणाली राबविण्यात येणार आहे. ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावरील कर्मचाºयांचे वेतन या प्रणालीच्या आधारे काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, पक्षनेते आनंद तानवडे, उमेश पाटील, बाळासाहेब धार्इंजे, किरण मोरे, अतुल पवार, अमर पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर शिंदे म्हणाले, समितीच्या पटलावर सात विषय होते.
दोन आयत्या वेळच्या विषयांवरही चर्चा झाली. ग्रामपंचायत, आरोग्य, पशुवैैद्यकीय, शिक्षण विभागातील कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी येतात. हजेरी तपासण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक्स प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, आरोग्य विभागातील कर्मचाºयांनी ग्रामपंचायतीमध्ये लावलेल्या बायोमेट्रिक्स प्रणालीवर हजेरी नोंदवायची आहे. ज्या शिक्षकांच्या शाळा ग्रामपंचायत कार्यालयापासून दूर आहेत त्यांनी गटशिक्षणाधिकाºयांचे पत्र घ्यायचे आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींना त्याबाबत सूचना दिल्या जातील.
वसतिगृहात अभ्यासिका, गं्रथालय सुरु कराच्समाजकल्याण विभागाच्या वतीने यशवंतनगर येथे मुलींसाठी वसतिगृह सुरु करण्यात आले. ते एका बचत गटाला चालविण्यास दिले आहे. येथे सध्या ६५ मुलींनी प्रवेश घेतले आहेत. या ठिकाणी आता एक अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरु करण्यात यावे. त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा, असे आदेशही संजय शिंदे यांनी दिले आहेत.